Saturday, 12 May 2018

"HotGates of Junnar" - शिवनेरी आणि नाणेघाट - एक भटकंती - भाग 1

"बरेच दिवस झाले आहेत आपण दोघे कुठे बाहेर भटकंतीला नाही गेलो" असं बायको म्हणाली. मला पण कुणकुण लागली होती एका भटकंतीची. २०१७ हे वर्ष माझ्यासाठी जरा पळापळीचे होते.  जुलै महिन्यात मी पेबगडावर गेलो होतो. सहा महिन्याचा कालावधी ओलांडून गेला होता. कुठे जायचे हाच मला प्रश्न पडला होता.

आम्ही ४ फेब्रुवारी रोजी भटकंतीसाठी मोहीम आखली आणि सकाळी १०च्या सुमारास आम्ही शिवनेरीच्या दिशेने आगेकूच केला. वाटेवर जाताना आम्हाला एक जर्मन दांपत्य दिसले. त्यांची मोहीम तर विश्वभ्रमंतीची होती. त्यांच्या वाहनामागे युरोप ते ऑस्ट्रेलिया या भ्रमंतीचा नकाशा होता. राजगुरूनगर टोल प्लाझा इथे आम्हाला त्या वाहनाचे छायाचित्र काढायची संधी मिळाली.

विश्वभ्रमंतीसाठी निघालेली मोटार 
नारायणगावला आम्ही शिवनेरी गडाकडे गाडी वळवली. नारायणगावपासून शिवनेरी किल्ला ९ मैलांवर आहे.
वाहनासाठी रास्ता उत्तम आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे पण तुम्हाला फारशी अडचण येणार नाही.
दुपारी १.३०च्या सुमारास आम्ही शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आलो. सूर्य डोक्यावर आला होता. फेब्रुवारी महिन्यात एका उन्हाळी दिवसाची आठवण होत होती. सध्या शिवनेरी एक मोठे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. गडावर गाड्यांची रांग लागली होती. शाळेकरी  मुलांची गर्दी जरा जास्ती होती. प्रशासनाने सध्या पोलिसांची उपस्थिती वाढवली आहे. गड चढण्या आगोदर तुम्हाला पोलीस पुस्तकामध्ये नोंद करावी लागते.  नोंदणी करून आम्ही पायरीने गड चढायला सुरवात केली. काही अंतरावर आहे पहिला दरवाजा - महाद्वार

महाद्वार - शिवनेरी 
महाद्वारावर काही जागा आहेत ज्या निरिक्षणासाठी वापरल्या जात असाव्या.


वडज धरन 
काही पायऱ्या चढल्यावर तुम्ही गणेश द्वारा पाशी पोचता. गणेशद्वारवर तुम्हाला ३ वेगळ्या प्रकारचे चिन्हे दिसतील १) हत्तीचे तोंड २) वाघाच्या पायाखाली २ हत्ती आणि एक गरुड तोंडापाशी. गणेशद्वारा नंतर आणखी ३ द्वार आहेत परवानगीद्वार, शिपाईद्वार आणि हत्तीद्वार.

गणेशद्वार 
काही अंतरावर गडावर जाणाऱ्या जुन्या पायऱ्या दिसतात. लोकांच्या सोईसाठी आता नवीन पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत.

जुन्या पायऱ्या 
जुना  दरवाजा 
काही अंतरावर सुशोभीकरण केलेली जिजाऊ बाग आहे. जिजाऊ बागेमागे मोठा अंबरखाना आहे.

शिवनेरीचा अंबारखाना 

ऐकेकाळी इथे घोडे-हत्ती उभे राहिले असतील 


अंबरखाना मध्ये पडणारा  प्रकाश 
अंबारखाना पासून आम्ही १५-२० मिनटे चालल्यानंतर आम्ही गंगा आणि यमुना टाके जवळ पोचलो. वर्षाच्या १२ ही महिने या टाक्यांमध्ये पाणी असते. पाणी स्वच्छ आणि थंडगार होते.

टाकापासून काही अंतरावर चालत आलात की एक चवथरा येतो. ईथे बाळ शिवाजी महाराज आणि राज माता जिजाऊ यांचा पुतळा आहे.

काही अंतरावर चालले की जुन्या वाडाचे अवशेष दिसतात. विशेष म्हणजे त्याकाळात असलेली पाण्याची व्यवस्था अजूनही शाबूत आहे. इथून पुढे तुम्हाला एक भव्य इमारत दिसते. शिवाजी महाराजांचे हे जन्म स्थान.
हिंदवी स्वराज्याचे जन्म स्थान 


बाहेरून दिसायला ही इमारत अभेदयं आहे. आतून मात्र इमारत जरा वेगळी आहे.



ईथे काही काळासाठी का असेना पण श्रद्धा आणि भक्तीच्या भावना निर्माण होतात.

शाळेकरी मुलं छायाचित्र काढताना
बदामी तळ्याच्या काठी 
पुढे काही अंतरावर चालत आलात की एक भव्य तलाव दिसतो. हा तलाव बदाम आकाराचा आहे. उन्हाळा सुरु असल्याने यात पाणी नव्हते. हे पाहून आम्ही परतीची वाट धरली आणि नाणे घाट पाहण्यासाठी आगेकूच केला.


सूचना - ट्रेक आखताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

१)सदर हवामानाचा अंदाज घेऊन ट्रेक कारावा. 
२) कृपया  कुठल्याही प्रकार करू नका. शिवाजी महाराजांचे हे जन्म स्थान आहे.
३)आपली सॅक जरुरी वस्तुंनी भरावी.
४) छायाचित्र काढताना आधी स्वतःला सुरक्षित करावे आणि  मग छायाचित्र काढावे.
५) कृपया कचरा करू नका.

अभिजित मोरे 
पुणे 
All photos in the blog are copyright infringement protected.








1 comment:

Trip to Paleshwar Dam & Waterfall

Paleshwar Dam and Hidden Waterfall We were in Kolhapur during Ganesh Utsav and wanted to travel to a new place close by which could be cover...